‘मंत्र्यांच्या बंगल्यांवर १७ कोटी ८८ लाख खर्च वर्षभरात झाला आहे. त्यामध्येही मंत्र्यांची निवासस्थाने, सदनिका, विधानसभेचा खर्च, मंत्रालय, शासकिय निवासी इमारती, सत्र न्यायालय इमारत, पोलिस महासंचालक कार्यालय व अन्य शासकीय इमारतींचाही समावेश आहे, अशी अजित पवार यांनी दिली आहे. तसंच, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर एक रुपयाही थकित बील नाहीये. या बातम्यात कोणत्याही पद्धतीचे तथ्य नाही,’ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
‘मोदी सरकारने अद्याप सुमारे ३० हजार कोटींचा निधी पाठवलेला नाही. मात्र, निधी नाही म्हणून कामं थांबलेली नाहीत आणि थांबणार नाहीत. गेल्या पाच वर्षात कुठे किती निधी दिला गेला हे आता मला सांगायला लावू नका,’ असं म्हणत पवारांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
‘करोनाचे संकट असताना वर्षभरात निसर्ग चक्रवादळाचं संकट आहे. त्यांनंतर अतिवृष्टीचं संकट आलं. पण आम्ही कधीही भेदभाव केला नाही. मात्र, राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राची टीम पत्रव्यवहार करुनही आली नाही,’ असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times