‘संसदेचं अधिवेशन घेतलं गेलंच नाही. आपण दोन दिवस अधिवेशन घेतोय. कारण आता करोनाचा धोका कमी होतोय. आम्ही काही श्रेय घेत नाहीत कारण ही वेळ नाहीये. पण, करोना रोखण्यास केलेले उपाय डब्ल्यूएचओला आणि वॉशिंग्टन पोस्टला दिसले ते तुम्हाला दिसले नाहीत याचे वाईट वाटते. धारावी मॉडेल ज्याचं कौतुक जागतिक पातळीवर केलं गेलं,’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे.
‘लस कधी येणार, याबाबत केंद्रानं काहीच सांगितलं नाही. आपल्याकडे औषधं नाहीयेत. आहे ती एकच गोष्ट हाथ धुणे, मास्क लावणं आणि सुरक्षित अंतर या सगळ्या गोष्टी हाच एक मार्ग आहे, असं नमूद करतानाच मुख्यमंत्र्यांनी पाश्चिमात्य देशांत पुन्हा करोनानं उसळी मारली आहे. तिथं आकडा वाढला आहे. तिथली जी परिस्थिती झालेली ती इथं होऊ नये म्हणून खबरदारी घेतोय, असंही त्यांनी म्हटलं आहे.
माझं कुटंब माझी जबाबदारी मोहिम राबवणारं पहिलं राज्य आहे. त्यातून दोन तीन गोष्टी आपण साधल्या आहेत. घराघरात जाऊन नागरिकांच्या आरोग्याची चौकशी केली, तपासणी केली, जनजागृती केली,अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मृत्यूंची संख्या लपवलेली नाही म्हणूनच इतर राज्यांच्या तुलनेनं जास्त आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
‘आरोप करा तो तुमचा अधिकार आहे. या आरोपांवर पॉझिटिव्ह म्हणून बघितलं पाहिजे. तुमच्या सुचनांचं स्वागत आहे. इतर देशांचं कौतुक करताना आपल्या राज्यातही अशा उपाययोजना राबवल्या आहेत,’ अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times