राजीनामा मागणारे कोण कार्यकर्ते आहेत हे मला माहिती नाही. पण चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वाखाली १०५ आमदार निवडुन आले आहेत. महापालिकेच्या निवडणुकीतही भाजपला दणदणीत यश मिळालं आहे. त्यामुळं एखादी निवडणूक हरल्यानंतर अशा प्रकारे जे लोक बोलत आहेत ते बेशिस्त करताहेत. त्यांचा हेतू योग्य नाही. मी आणि चंद्रकांत दादा त्यांच्याशी बोलून घेऊ, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपतल्या अंतर्गंत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात भाजपचा ज्या पद्धतीनं पराभव झाला, तो पक्षातील व परिवारातील जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनाला लागला आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील व जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे या दोघांवर निवडणुकीची प्रामुख्यानं जबाबदारी होती. मात्र, या दोघांनीही ही निवडणूक गांभीर्यानं घेतली नाही. बाहेरून आलेल्या पदाधिकाऱ्यांवर विसंबून राहून एकतर्फी विजय होईल, अशा भ्रमात ते राहिले. त्यांनी ही निवडणूक व्यवस्थित हाताळली नाही. त्यामुळंच भाजपचा एवढ्या मोठ्या फरकानं पराभव झाला,’ असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times