मुंबई: झटपट पैसे कमविण्यासाठी छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्याने फिल्मी फंडा वापरून अनेकांना फसविल्याचे समोर आले आहे. पोलीस असल्याची बतावणी करून डेहराडूनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना चुना लावणाऱ्या या अभिनेत्याला गुन्हे शाखेच्या पथकाने ओशिवरा येथून अटक करून पोलिसांच्या ताब्यात दिले. ( )

वाचा:

डेहराडून येथील एका वृद्ध महिलेला पोलीस असल्याचे सांगून तिच्याकडून पाच लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली. याप्रकरणी ३ डिसेंबर रोजी डेहराडून येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक माहितीवरून या गुन्ह्यातील आरोपी मुंबईच्या ओशिवरा परिसरात वास्तव्यास असल्याचे डेहराडून पोलिसांना कळल्यावर त्यांचे पथक मुंबईत आले. गुन्हे शाखा युनिट- ८ चे प्रभारी पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक लक्ष्मीकांत शेलकर, प्रथमेश विचारे, अमित देवकर यांना डेहराडून पोलिसांच्या मदतीला देण्यात आले. त्यानंतर उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने ओशिवरा येथील जय अंबे सोसायटी येथून सलमान याला शोधून काढले.

वाचा:

पोलिसांनी सलमान याला ताब्यात घेतल्यावर सखोल चौकशी केली असता तो टीव्ही कलाकार असल्याचे समोर आले. ‘चितौडगड की राजकुमारी पद्मिनी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज’, ” या मालिकांमध्ये तसेच ‘गुलमकाई’, बहनचोर या सिनेमांमध्ये त्याने सहकलाकार म्हणून काम केले आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये फसवणूक करून तो विमानाने मुंबईत येत असल्याचे पोलिसांच्या चौकशीतून पुढे आले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here