सिडनी, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला दोन दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे. पण आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या तब्बल १३ खेळाडूंना दुखापत झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला हा मोठा धक्का पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी बसू शकतो, असे म्हटले जात आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, ऑस्टन अगर, जोश हेझलवूड, मॉइसेस हेनरिक्स, विल पुकोस्की, कॅमेरुन ग्रीन, जॅक्सन बर्ड, सीन अॅबॉट आणि हॅरी कॉनवे हे १३ खेळाडू आतापर्यंत दुखापतग्रस्त झाले आहे. भारताचा ऑस्ट्रेलियाचा दौरा जेव्हापासून सुरु झाला तेव्हापासून हे १३ खेळाडू जायबंदी झालेले पाहायला मिळाले आहे.

भारताचा दौरा सुरु झाल्यापासून ऑस्ट्रेलियाच्या मागे दुखापतींचे ग्रहण लागले आहे. आतापर्यंत त्यांचे १३ खेळाडू जायवंदी झाले होते, त्यापैकी तीन खेळाडू भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहेत. अन्य १० खेळाडूंचा वैद्यकीय अहवाल हा १६ डिसेंबरला येणार आहे. त्यावेळी बाकीचे १० खेळाडू फिट आहेत की नाही, हे समजू शकेल.

डेव्हिड वॉर्नरला गंभीर दुखापत झाली आहे, त्यामुळे तो ट्वेन्टी-२० सामन्यांमध्येही खेळला नव्हता. त्याचबरोबर या दुखापतींतून सावरण्यासाठी त्याला अजून काही दिवस लागणार आहे. त्यामुळे वॉर्नर हा पहिल्या कसोटी सामन्यामध्ये खेळू शकणार नाही. विल पुकोस्कीच्या डोक्याला सराव सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे त्याची दुखापतही गंभीर असून त्याला पहिल्या कसोटीत खेळता येणार नाही. त्याचबरोबर सीन अॅबॉटही पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहे.

आज सराव करत असताना स्टीव्हन स्मिथ हा चेंडू घेण्यासाठी खाली वाकला आणि त्यानंतर त्याच्या पाठीमध्ये दुखायली सुरुवात झाली. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे स्मिथ आजचा पूर्ण दिवस विश्रांती घेणार असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने सांगितले आहे. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाचे सात खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामध्येच जर स्मिथची दुखापत गंभीर असेल तर तो ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी मोठी धक्का ठरू शकतो. त्यामुळे स्मिथ हा सराव करायला उतरणार की नाही आणि तो पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here