पाटणाः बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (nitish kumar) यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत १५ महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब केलं. बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापल्यानंतर मंत्रिमंडळाची मंगळवारी दुसरी बैठक झाली. नितीश सरकारच्या सुशासनाच्या कार्यक्रमांतर्गत मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढील पंचवार्षिक कृती योजनेस मंजुरी देण्यात आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत एनडीएच्या निवडणूक ( covid 19 vaccine ) आश्वासनांची पूर्तताही झाली. मंत्रिमंडळ बैठकीत शिक्षण, तरुणांचे रोजगार, पदवी उत्तीर्ण मुली विद्यार्थ्यांना ५० हजार प्रोत्साहन निधी, हृदयातील छिद्र असणाऱ्या मुलांवर मोफत उपचार, वृद्धांशी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

रोजगार निर्मितीवर शिक्कामोर्तब आणि विनामूल्य कोरोना लसीकरणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

बिहारमधील नवीन एनडीए सरकार येत्या पाच वर्षांत २० लाख रोजगार निर्मिती करेल. या संधी सरकारी आणि खासगी क्षेत्रात निर्माण होतील. तरुणांना स्वयंरोजगारासाठी जास्तीत जास्त ५ लाख रुपये अनुदान दिले जाईल. याशिवाय पाच लाख रुपयांचे कर्ज अवघ्या एक टक्के व्याजावर देण्यात येईल. बिहारमधील नागरिकांना मोफत मिळेल. याशिवाय अविवाहित महिलांना १० वी पास झाल्यावर २५००० रुपये आणि पदवीसाठी ५०००० रुपये आर्थिक मदत दिली जाईल. हृदयाला छिद्र असलेल्या जन्मलेल्या मुलांना मोफत उपचार दिले जाईल.

विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने बिहारमध्ये १९ लाख रोजगार निर्माण करण्याचे आणि सर्वांना करोनाची लस मोफत देण्याचे आश्वासन दिलं होतं. आमचे सरकार पुन्हा आल्याल पदवी पास विद्यार्थींनींना ५० हजार रुपये प्रोत्साहन रक्कम दिली जाईल, असं आश्वासन नितीशकुमार यांनी दिलं होतं.

भाजपमुळे अडकला मंत्रिमंडळ विस्तार?

बिहारमधील एनडीएच्या आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्याच्या मंत्र्यांनाही पुढील एका महिन्यासाठी एकापेक्षा जास्त विभाग सांभाळावे लागतील. भाजपमुळे बिहारमधील मंत्रिमंडळ विस्तार सध्या रखडला आहे, असं मुख्यमंत्री नितीशकुमारांचं म्हणणं आहे. भाजपकडून मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असं नितीशकुमार म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजपला केंद्रीय नेतृत्वाला घाई नाही, असा अर्थ काढला जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here