मुंबई: मुख्यमंत्री यांनी आज आणि इतर आरक्षणांबाबत अत्यंत स्पष्ट शब्दांत सरकारची भूमिका मांडली. ‘ मराठा आरक्षणाचा विषय अत्यंत संवेदनशील आहे. आरक्षणासाठी चाललेली सरकारची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि ही लढाई आम्ही जिं कणारच, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. ( Latest News Update )

वाचा:

मराठा आरक्षणावरून विरोधी पक्ष सातत्याने ठाकरे सरकारला लक्ष्य करत आहे. मराठा समाजाला देत असताना इतर समाजांचं आरक्षण कमी केलं जाणार असे आरोपही करण्यात येत आहेत. हे आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावले. ‘मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजांच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावला जाणार नाही. मुख्यमंत्री म्हणून मी हे अत्यंत जबाबदारीने आणि रेकॉर्डवर सांगतोय, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. मराठा आरक्षणाची लढाई लढत असताना आपण कुठेही कमी पडलेलो नाही. हे आरक्षण टिकवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात तुम्ही वकिलांची जी फौज उभी केली होती ती आम्हीही तशीच ठेवली आहे. आरक्षणाबाबत या सरकारने भूमिकेतही कोणताच बदल केलेला नाही आणि करणार नाही. त्यामुळे आरक्षणावरून जे कोणी समाजांत आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यावर आम्हाला पाणी टाकावंच लागणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

वाचा:

विरोधकांच्या सर्वच आरोपांना उत्तर देण्याची मला गरज वाटत नाही. माझ्या सहकारी मंत्र्यांनी त्यांच्या आरोपांना योग्यती उत्तरं दिली आहेत. तरीही तुम्ही आमच्या मानगुटीवर बसण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याला आम्ही काहीही करू शकत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला.

फडणवीस दिल्लीत जावेत ही मुनगंटीवारांची इच्छा!

यांनी आज सभागृहात जोरदार फटकेबाजी केली. त्यावर बोलताना दिल्लीत जावेत ही तर मुनगंटीवार यांची इच्छा असल्याचा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी लगावला. मागील काळात अनेक जण आमच्या कुंडल्या काढत होते. सरकार पडणार असे पुन्हा पुन्हा सांगत होते. पण सरकार काही पडत नाही म्हटल्यावर ते आता पुस्तके आणि अहवाल वाचू लागले आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे फडणवीसांची फिरकी घेतली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here