अनिल विज यांना २० नोव्हेंबरला करोनाच्या लस ‘कोव्हॅक्सिन’ चा पहिला डोस देण्यात आला होता. लसचा पहिला डोस घेतल्यानंतरही ते ५ डिसेंबरला करोना पॉझिटिव्ह आढळून आले. यानंतर आरोग्य मंत्रालयाला या संदर्भात स्पष्टीकरण द्यावे लागले. अनिल विज यांना भारत बायोटेक आणि आयसीएमआर विकसित केलेल्या ‘कोव्हॅक्सिन’ चा डोस देण्यात आला.
करोनाची लस दुसरा डोस घेतल्यानंतर सुमारे १४ दिवसानंतर काम करण्यास सुरवात करते, हे डॉक्टरांनी आपल्याला आधीच सांगितलं होतं, असं अनिल विज यांनी स्पष्ट केलं. लसचा दुसरा डोस हा पहिल्या डोसच्या २८ दिवसानंतर दिला जातो. १४ दिवसांनंतर शरीरात प्रतिकारशक्ती विकसित होतात. तरच तुम्हाला करोनापासून संरक्षण मिळू शकतं. म्हणजेच, या संपूर्ण प्रक्रियेस ४२ ते ४५ दिवस लागतात. पण या दरम्यान लसपासून कोणतंही संरक्षण होत नाही.
जेजेपी नेते ४ डिसेंबरला भेटले
आंदोलनादरम्यान शेतकर्यांवर दाखल केलेले गुन्हे त्वरित रद्द करण्याची मागणी जननायक जनता पक्षाने गृहमंत्री अनिल विज यांच्याकडे केली. चंदिगड येथील गृहमंत्र्यांच्या सचिवालय कार्यालयात जेजेपीच्या वरिष्ठ नेत्यांच्या तीन सदस्यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली होती. आघाडी सरकारमध्ये समावेश असलेल्या जेजेपीच्या नेत्यांनी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. या संबंधी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू, असं अनिल विज यानंतर म्हणाले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times