नवी दिल्ली: अभिनेत्यावरून नेते बनलेल्या कमल हासन ( ) यांनी मंगळवारी संध्याकाळी आपला सहकारी सुपरस्टार रजनीकांतसोबत ( ) काम करण्याची इच्छा व्यक्त केली. आपली विचारधारा एकच असेल आणि याचा जनतेला फायदा होत असेल तर अहंकार सोडून आपण एकमेकांना सहकार्य करण्यास तयार असलं पाहिजे, असं म्हणाले. यांचा पक्ष अखिल भारतीय मक्कल सेवा कच्चीशी (ऑल इंडिया पीपल्स सर्व्हिस पार्टी) युती करण्याबाबत कमल हसन यांनी सकारात्मक संकेतही दिले.

आम्ही आता फक्त एका फोन कॉलपासून दूर आहोत. युतीबाबतचा निर्णय रजनीकांत यांनी घ्यायचा आहे. रजनीकांत यांनी संपर्क केल्यास आम्ही एकत्र बसून यावर पुढील चर्चा करू, असं कमल हासन म्हणाले. असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमसोबत युती करायाची की नाही? याचा निर्णय पक्षाने माझ्यावर सोपवला आहे. लवकरच त्याच्यांसोबत युतीची घोषणा करन. यावर आताच काही सांगू शकणार नाही, असं कमल हसन यांनी स्पष्ट केलं.

पुढच्या वर्षी होणाऱ्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी हसन यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात १३ डिसेंबरपासून केली आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा १३ ते १६ डिसेंबर असा आहे. यात ते मदुराई, थेनी, दिंडुगुल, विरुधुनगर, तिरुनेलवेली, तूतीकोरिन आणि कन्याकुमारी या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. त्यांनी २०१८ मध्ये स्वत: चा पक्ष स्थापन केला आणि लोकसभा निवडणूकही लढवली. पण त्यांच्या पक्षाकडून यश आलं नाही.

रजनीकांत यांनीही स्वत: चा पक्ष स्थापन केला आहे. त्यांच्या पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह समोर आलं आहे. रजनीकांत यांच्या पक्षाचे नाव अखिल भारतीय मक्कल सेवा कच्छी (अखिल भारतीय पीपल्स सर्व्हिस पार्टी) असं ठेवलं गेलं असून पक्षाचे चिन्ह ‘रिक्षा’ असं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here