नागपूर: सशस्त्र दरोडेखोरांनी दोन माजी सैनिकांच्या घरावर टाकून रोकड व दागिने लुटले. पिस्तूल घेऊन दरोडेखोर पसार झाले. ही थरारक घटना बुधवारी पहाटे नवीन कामठीतील रनाळा येथील पुरूषोत्तम ले-आऊट येथे घडली.या घटनेने प्रचंड खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

पहाटे तीन वाजताच्या सुमारास तोंडावर कापड बांधलेले पाच सशस्त्र दरोडेखोर माजी सैनिक सुनील डेव्हिड यांच्या घरात घुसले. हॉलमध्ये डेव्हिड यांचा मुलगा झोपला होता. दरोडेखोरांनी त्याला बंधक बनविले. आरडाओरड केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दरोडेखोर डेव्हिड यांच्या खोलीत घुसले. कपाटातील १० हजारांची रोकड घेतली. डेव्हिड यांच्या पत्नीच्या बोटातील सोन्याची अंगठी हिसकावली. तसेच डेव्हिड यांच्याकडील परवानाधारक पिस्तूल घेऊन दरोडेखोर पसार झाले.

डेव्हिड यांच्याकडे दरोडा घातल्यानंतर दरोडेखोरांनी माजी सैनिक शरद सहारे यांच्या घराचे कुलूप तोडले. घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले. मात्र दरोडेखोरांच्या हाती काहीच लागले नाही. दरोडेखोर तेथूनही पसार झाले. सहारे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त निलोत्पल, सहाय्यक पोलिस आयुक्त परशुराम कार्यकर्ते, गुन्हेशाखा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून दरोड्याचा गुन्हा दाखल केला. दरोडेखोरांच्या शोधासाठी पाच पथके स्थापन करण्यात आली आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here