पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चनसिंग उपस्थित होते. शहरातील वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये रात्री कारवाईला सुरूवात केली. या कारवाईत पोलिसांकडे असलेल्या रेकॉर्डवरील १२१३ गुन्हेगारांना तपाण्यात आले. त्यापैकी ५७२ गुन्हेगार हाती लागले. त्यामध्ये खास करून ‘टॉप २०’ असे ३७२ गुन्हेगार तपासले. त्यामध्ये २१५ गुन्हेगार आढळले. तसेच, परत गुन्हे करणारे ५३० आरोपींची झडती घेतली.
खून व खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पॅरोलवर सुटलेले १२१ आरोपींची झडती घेतली असता, त्यापैकी ७३ गुन्हेगार आढळून आले आहेत. तसेच, वॉन्टेड असलेल्या १९० गुन्हेगारांचा शोध घेतला असता, त्यापैकी दोन जण पोलिसांच्या हाती लागले. या कारवाईत पोलिसांनी पाच आरोपींना अटक करून, त्यांच्याकडून पाच पिस्तूल व नऊ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तसेच, ५० आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ४० कोयते, पाच तलवारी, एक कुकरी, पालघन, सुरा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईसाठी झोनचे पाच व गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त, १२ सहायक पोलीस आयुक्त, ३० पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि त्यांचे कर्मचारी, २८ प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांनी सहभाग घेतला.
गुन्हेगारी टोळीतील ३२८ गुन्हेगारांची तपासणी
शहरातील विविध टोळ्यांमधील रेकॉर्डवर असलेल्या ३२८ गुन्हेगारांची खंडणी विरोधी पथकाकडून झडती घेण्यात आली. वाहन चोरी व दरोडा प्रतिबंधक विभागाने वाहनचोरीतील ४९ आरोपींची तपासणी केली. अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत भारती विद्यापीठ परिसरात गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. तर, कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ ग्रॅम एमडी जप्त केला आहे. तसेच, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून तीन महिलांची सुटका केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times