पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे गेली ५० वर्षे राजकीय जीवनात कार्यरत असून या प्रवासात त्यांनी अनेक सहकारी जोडले आहेत. या सहकाऱ्यांप्रती पवारांच्या मनात किती आदर आणि जिव्हाळा आहे, याचे दर्शन आज पुन्हा एकदा घडले. ( Latest News Update )

वाचा:

शरद पवार यांचे जुने सहकारी यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. याबाबत माहिती मिळताच जेधे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी शरद पवार आज थेट त्यांच्या गावी पोहचले. तिथे पवार यांनी सहवेदना व्यक्त करताना कुटुंबीयांना धीर आणि आधारही दिला. याबाबत पवार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. ‘पुण्याच्या तालुक्यातील माझे जुने सहकारी संपतराव जेधे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबाची आणि त्यांच्या आंबवडे गावातील ग्रामस्थांची आज भेट घेऊन संपतरावांच्या निधनाबद्दल माझ्या सहवेदना व्यक्त केल्या’, असे पवार यांनी नमूद केले आहे.

वाचा:

‘संपतराव जेधे यांनी सरकारकडे जे काही मागितले ते मतदारांसाठी, जनतेसाठी मागितले. स्वतःसाठी फक्त पंढरपूर मंदिराच्या कमिटीवर नेमण्याची इच्छा व्यक्त केली. तिथे पांडुरंगाची आणि उन्हातान्हात पंढरीला येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा घडावी, ही त्यांची मनोमन इच्छा होती. अशी निस्वार्थी, जीवाभावाची माणसे, हा आपला ठेवा असतो. संपतरावांच्या रूपाने हा ठेवा गेल्याचं मला दु:ख आहे. गावकऱ्यांना एवढेच सांगणे आहे की, संपतरावाच्या कुटुंबाची त्यांनी काळजी घ्यावी. काहीही अडचणी आल्यास मला कळवावे, मी त्यांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असेन’, असा शब्दच शरद पवार यांनी यावेळी जेधे कुटुंबाला दिला. पवारांनी सहकाऱ्याबद्दल व्यक्त केलेल्या या हृद्य भावनांनी तेथील वातावरण भावुक बनलं होतं.

वाचा:

कोण होते संपतराव जेधे?

भोरचे माजी आमदार संपतराव जेधे यांचे मंगळवारी आंबवडे येथील निवासस्थानी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. आंबवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून राजकीय कारकीर्द सुरू करणारे जेधे १९७८ मध्ये अपक्ष निवडणूक लढवून विधानसभेवर निवडून गेले होते. भोर पंचायत समितीचे सभापती, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अशी पदेही त्यांनी सांभाळली. समितीचे ते १० वर्षे विश्वस्त होते. पंढरपूर आणि आळंदी येथील भक्तनिवास उभारण्यात त्यांचे मोठे योगदान होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here