सिडनी, : भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी आता सराव करत आहे. पण भारताच्या सरावाचा एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय संघ मैदानात सरावासाठी उतरला आहे. पण भारतीय संघातील खेळाडू एकमेकांबरोबर मारामारी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. नेमकं घडलंय तरी काय, पाहा…

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला काही तासांमध्येच सुरुवात होत आहे. पण बीसीसीआयने खेळाडूंच्या सरावाचा व्हिडीओ काल पोस्ट केला होता, तो आता चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय खेळाडू सराव करत आहेत. भारतीय खेळाडूंचे दोन गट करण्यात आले आहेत. या व्हिडीओच्या सुरुवातीला हे खेळाडू एकमेकांबरोबर मारामारी करत असल्याचे तुम्हाला वाटत असेल. पण ताकद वाढवण्यासाठी केलेला तो एक सराव असल्याचे म्हटले जात आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामने कुठे पाहता येतील, पाहा….भारताच्या या दौऱ्यातील सर्व सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण सोनी सिक्स आणि डीडी स्पोट्स वर होणार आहे. या शिवाय Sony LIVवर लाइव्ह स्ट्रीमिंग होईल. कसोटी मालिका फक्त सोनी सिक्स आणि Sony LIV वर दिसेल. या शिवाय भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. या सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अॅपवर केले जाणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या लढतीचे LIVE UPDATE आणि स्कोअरकार्ड महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाइटवर तुम्ही पाहू शकता.

भारतीय संघा कोणाची झाली निवड, पाहा…पहिल्या कसोटी सामन्यासाठी पृथ्वी शॉसोबत सलामीवीर म्हणून अपेक्षेप्रमाणे मयांक अग्रवालचा समावेश केला गेलाय. या शिवाय मधळ्या फळीत कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी यांना स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या सराव सामन्यात धमाकेदार शतक करणाऱ्या ऋषभ पंतला संघात स्थान मिळवता आले नाही. त्याच्या ऐवजी विराटने अनुभवी वृद्धीमान साहाची निवड केली आहे. फिरकीपटू म्हणून आर अश्विन तर जलद गोलंदाजांमध्ये अपेक्षे प्रमाणे उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश केला गेलाय. संघात शुभमन गिल आणि केएल राहुल यांना स्थान मिळवता आले नाही.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक१) पहिली कसोटी- १७ ते २१ डिसेंबर, एडिलेड ओव्हल- डे/नाईट (सकाळी ९ वाजता)
२) दुसरी कसोटी- २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न (पहाटे ५ वाजता)
३) तिसरी कसोटी- ७ ते ११ जानेवारी २०२१, सिडनी (पहाटे ५ वाजता)
४) चौथी कसोटी- १५ ते १९ जानेवारी, २०२१, गाबा (पहाटे साडे पाच वाजता)

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here