मुंबई: ‘पायाला भिंगरी बांधल्यासारखे आजही काम करत आहेत. या वयात इतकं प्रचंड काम करणारा दुसरा एकही नेता आज देशात नाही हे नाकारता येणार नाही’, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी केले. ( Latest News Update )

वाचा:

जनसुराज्य पक्षाचे नेते आणि हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यावेळी अजित पवार बोलत होते. राजकीय जीवनात शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ३० वर्षे काम करत आहोत. यामध्ये अनेक लोकांची ओळख होत असते. त्यामध्ये राजीव आवळे यांचं काम मी पहात आलो आहे. ते गरीब व वंचित वर्गासाठी काम करत आहेत असे अजित पवार म्हणाले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून तुम्हाला मदत करण्याची आमची भूमिका असणार आहे. आता कोल्हापूर जिल्ह्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायतीमध्ये आपले अधिक सदस्य कसे निवडून येतील, हे आपल्याला पाहावे लागणार आहे, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

वाचा:

सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचे काम राष्ट्रवादी करत आहे. दोन्ही खासदार निवडून देणारा हा जिल्हा आहे. पक्षावर आणि शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा हा जिल्हा आहे, याची आठवणही अजित पवार यांनी करून दिली. पश्चिम महाराष्ट्र हा बालेकिल्ला आहे त्यात अधिक भर घालण्याचे काम करू. मातंग समाजाच्या साथीने आपण पक्ष वाढवूया, असे आवाहनही अजित पवार यांनी केले. राजीव आवळे यांचासारखा एक चांगला माणूस आपल्या पक्षात येत आहे, असे म्हणत प्रदेशाध्यक्ष यांनी आवळे यांचे स्वागत केले.

वाचा:

भाजपमध्ये गेलेल्यांना साद

विधानसभा निवडणुकीवेळी काहींना प्रलोभनं दाखवून तर काहींना भीती दाखवून फोडण्याचे काम भाजपने केले. राज्यात आघाडीचं सरकार येणार नाही, असे वाटून अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, आपण आघाडी का सोडली असा प्रश्न या नेत्यांना पडला आहे, असे नमूद करत या नेत्यांना अजित पवार यांनी माघारी फिरण्यासाठी साद घातली. जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांना तिन्ही पक्ष मिळून निवडून आणण्याचा प्रयत्न करतील, असा विश्वासही अजित पवार यांनी दिला.

भाजपवर मुश्रीफ यांचा गंभीर आरोप

जे आज पक्षात प्रवेश करत आहेत त्यांची विविध विकासकामे करण्यासाठी मदत करू. राजीव आवळे हे जनसुराज्य पक्षाचे आता नाहीत. पक्षाने तिकीट न दिल्यामुळे त्यांनी बंडखोरी करून अगोदरच राजीनामा दिला होता. त्यामुळे ते सध्या तरी अपक्ष आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क लक्षात घेता पक्षाला त्यांची चांगली मदत होणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. भाजपने धमक्या दिल्या होत्या आणि प्रवेश करून घेतला होता ते सर्व आज राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्याची सुरुवात आज राजीव आवळे यांच्या प्रवेशाने होत आहे असेही हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here