नवी दिल्ली: हैदराबादमधील स्वदेशी कंपनी (Bharat Biotech) करोना व्हायरसवर (Coronavirus) ‘कोव्हॅक्सिन’ (Covaxin) लस विकसित केली आहे. ‘लसमुळे रोगप्रतिकार शक्ती निर्माण झाली आणि लसचे कोणतेही विपरीत परिणाम (साइड इफेक्ट ) दिसून आले नाहीत’, या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीचा निष्कर्ष कंपनीने बुधवारी संध्याकाळी जाहीर करताना सांगितलं.

‘या लसीमुळे न्यूट्रलाइजिंग अँटीबॉडीजला (एक प्रकारची रोगप्रतिकारक प्रतिक्रिया) चालना मिळाली आणि सर्व प्रकारच्या डोस ग्रुपमध्ये याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि या लसीशी संबंधित कोणताही विपरित परिणाम दिसून आला नाही’, असं कंपनीने सांगितलं.

‘पहिल्या डोसनंतर विपरित परिणाम सौम्य किंवा मध्यम प्रमाणात झाले होते आणि कोणत्याही औषधाविना ते लवकर बरे झाले. सर्वात सामान्य विपरित परिणाम हा इंजेक्शनच्या जागी होता, जा स्वतःहून बरा झाला’, असं कंपनीने म्हटलंय.

सरकारकडे करोना लसीच्या तातडीच्या वापरासाठी तीन कंपन्यांनी अर्ज केला आहे. यापैकी एक ही आहे.

कोव्हॅक्सिन पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुरक्षितता आणि क्षमता यासंबंधी माहितीसह उपलब्ध होईल, अशी माहिती कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इल्ला यांनी १० डिसेंबरला दिली होती. भारत सरकार टप्प्याटप्प्याने लसीकरण मोहीम राबवणार आहे. या योजनेत ही लस २०२१ च्या पहिल्या तिमाहीत पहिल्या टप्प्यात दिली जाण्याची शक्यता आहे.

स्वदेशी कंपनी भारत बायोटेक नाकातून देण्यात येणाऱ्या करोनाविरोधी लसदेखील विकसित करत आहे. ज्याची पहिला टप्प्याची चाचणी पुढच्या महिन्यात सुरू होईल. भारत बायोटेक कोव्हॅक्सिनसह इतर लसींच्या निर्मितीसाठी आणखी दोन युनिट उभारत आहे, अशी माहिती लस उत्पादकाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एल्ला यांनी ८ डिसेंबरला रोजी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here