म. टा. प्रतिनिधी, मुंबई

अभिनेता याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने () पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावले आहे. या प्रकरणात अलीकडेच अर्जुनची मैत्रीण गॅब्रिएला हिचा भाऊ अॅजीसिआलोस डिमिट्राडेज याला जामीन मिळाला आहे. त्यानंतर अर्जुनची पुन्हा चौकशी होणार आहे.

अमली पदार्थ दलाली करणाऱ्यांच्या चौकशीत एनसीबीला अर्जुन व गॅब्रिएला यांची माहिती मिळाली होती. त्या संशयावरून १५ नोव्हेंबरला अर्जुनच्या घरी टाकलेल्या छाप्यात ‘ट्रामाडोल’ नावाच्या प्रतिबंधित औषधी गोळ्या सापडल्या होत्या. परंतु ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेत असल्याचा पुरावा अर्जुनने दाखवला होता. त्यामुळे एका चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले. त्यानंतरच एनसीबीने अॅजीसिआलोसला अटक केली होती. आता अॅजीसिआलोसला जामीन मिळताच अर्जुनची एनसीबीला पुन्हा चौकशी करायची आहे. सध्या अन्यत्र व्यग्र आहे. त्यामुळे २२ डिसेंबरनंतर चौकशीला उपस्थित राहण्याची मुदत अर्जुनने एनसीबीकडे मागितली आहे. त्याबाबत एनसीबीने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here