मुंबईः पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता मध्य रेल्वेवरही वातानुकूलित लोकल धावू लागली आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण मुख्य मार्गावर एसी लोकलचा आजपासून शुभारंभ झाला आहे. कुर्ला स्थानकातून आज पहिली लोकल रवाना झाली आहे.

पश्चिम रेल्वेवर २५ डिसेंबर २०१७ला पहिली वातानुकूलित लोकल गाडी धावली. सामान्य ‘भेल’ लोकलमध्ये बदल करत त्याचे वातानुकूलित गाडीत रूपांतर करून ती चालविण्यात येत आहे. त्याच प्रमाणे रेल्वे प्रशासनाने सीएमएमटी ते कल्याण स्थानकादरम्यान १० धावणार आहेत. एसी लोकलची सेवा सोमवार ते शनिवारी सुरु राहणार असून सर्वच स्थानकांवर ही लोकल थांबणार आहे.

एसी लोकल सुरु झाल्यानंतर प्रवाशांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहे. एसी लोकल सुरु करण्याचा निर्णय चांगला असून उन्हाळ्यात लोकलमधून प्रवास करणे दिलासादायक ठरेल, अशी प्रतिक्रिया एका प्रवाशानं व्यक्त केली आहे.

तिकीटाची किंमत

पहिली एसी लोकल पहाटे ५.४२ वाजता कुर्ला-सीएसएमटी असून, शेवटची एसी लोकल रात्री ११.१५ वाजता सीएसएमटीहून कुर्ल्यासाठी रवाना होईल. या लोकलसाठी कमाल ६५ ते किमान २१० रुपये मोजावे लागणार आहेत. ही लोकल सोमवार ते शनिवार दरम्यान धावेल. रेल्वे आणि राज्य सरकारने मंजूर केलेल्या प्रवाशांनाच या लोकलमधून प्रवासाची मुभा असणार आहे.

एसी लोकलचे वेळापत्रक?

मार्ग – वेळ
कुर्ला सीएसएमटी : पहाटे ५.४२
सीएसएमटी- डोंबिवली : सकाळी ६.२३
डोंबिवली- सीएसएमटी : सकाळी ७.४७
सीएसएमटी- कुर्ला : सकाळी ९.१२
कुर्ला-सीएसएमटी : दुपारी ४.३६
सीएसएमटी-कल्याण : दुपारी ५.१२
कल्याण-सीएसएमटी : सायंकाळी ६.५१
सीएसएमटी-डोंबिवली : रात्री ८.२२
डोंबिवली-सीएसएमटी : रात्री ९.५९
सीएसएमटी-कुर्ला : रात्री ११.१५

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here