नवी मुंबई: २६ वर्षीय बांगलादेशी केल्याप्रकरणी पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली आहे. तो प्रियकरही बांगलादेशी आहे. अटक केलेला २४ वर्षीय तरूण हा तिच्यासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होता.

अन्य पुरुषासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून त्यांचे भांडण झाले होते. त्याने तिची गळा आवळून हत्या केली. तीन आठवड्यांनंतर बंद फ्लॅटमध्ये तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

कळंबोलीतील एका बंद फ्लॅटमध्ये ७ डिसेंबर रोजी एका तरुणीचा मृतदेह आढळला होता. तीन आठवड्यांपूर्वी तिची गळा आवळून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानंतर मारेकरी फ्लॅटचा दरवाजा बंद करून पसार झाला होता. लिपी सागर शेख असे तरुणीचे नाव होते. ती बेकायदा वास्तव्यास होती. बांगलादेशातील तिच्या दोन सहकारी महिलांसोबत ती फ्लॅटमध्ये राहत होती. नवी मुंबईत त्या नोकरीला होत्या.

लॉकडाऊनच्या काळात तिघींचीही नोकरी गेली. लिपीच्या दोन्ही सहकारी बांगलादेशात परतल्या. ती एकटीच फ्लॅटमध्ये राहत होती. तिच्या सहकारी महिला मुंबईत पुन्हा परतल्यानंतर बंद फ्लॅटमध्ये लिपीचा मृतदेह आढळून आला होता. लिपीसोबत राहणाऱ्या तरुणींनी दिलेल्या जबाबानुसार, आम्ही परतल्यानंतर फ्लॅटवर गेलो. लिपीशी फोनवरून संपर्क होऊ शकला नाही. त्यांनी फ्लॅटच्या मालकाशी संपर्क साधला आणि चावी मागितली. मात्र, माझ्याकडे चावी नसून, लिपी तिथे राहत असल्याचे त्याने सांगितले. बनावट चावी बनवणाऱ्याला घेऊन आल्यानंतर त्याने दरवाजा उघडला.

फ्लॅटमध्ये लिपी मृतावस्थेत आढळून आली. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. अधिक चौकशी केली असता, लिपी ही बांगलादेशी व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानेच तिची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना होता. पोलिसांनी त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. तपास केला असता, संशयित आरोपी बांगलादेशला परतला नसून, तो मुंबईत असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली. पोलिसांनी पथके रवाना केली. तसेच त्याला अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिचे अन्य व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. यावरून भांडण झाले. त्याच रागात त्याने तिचा गळा आवळून हत्या केली, असे त्याने पोलिसांना सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here