मेट्रो कारशेडचा विषय विरोधी पक्षानं राजकीय केला असून त्यात न्यायालयाने पडू नये आणि ते योग्य आहे. अशी टीका करतानाच राऊत यांनी न्यायालयाच्या कामकाजावर संताप व्यक्त केला आहे. संजय राऊतांनी केलेल्या या टीकेला भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी थेट त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
‘संजय राऊत यांनी न्यायालयावर टीका करत न्यायालयाने काय करावं असं मार्गदर्शनच ते करु लागले आहेत. हा एक प्रकारे न्यायालयावरील अविश्वास आहे असून लोकशाहीसाठी घातक आहे. न्यायालय कोणत्याही सरकारच्या आदेशावर चालत नसतं. कोर्टावर कोणताही आरोप करणं म्हणजे न्यायालयाचा अवमान आहे. त्यामुळं राऊत यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्याची गरज आहे,’ अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
‘सामनाच्या अग्रलेखातून बेजबाबदार टीका केली तसंच, नेत्यांवर आक्षेप घेतले ते आपण राजकीय टीका-टिप्पणी म्हणून समजून घेऊ. परंतु, या देशात बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वोच्च न्यायव्यवस्था केली आहे. या न्यायव्यवस्थेच्या बाबतीत असे आक्षेप घेतले जात असतील तर यापेक्षा दुर्देव न्यायव्यवस्थेचं असू शकतं नाही. त्यामुळं न्यायव्यवस्थेनं दखल घेण्याची गरज आहे,’ अशी मागणी त्यांनी केली आहे.
महाराष्ट्रात सरकार आलं नाही याचं दुखः मी समजू शकतो, असा टोला राऊतांनी भाजपला लगावला होता. यावरही दरेकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आम्हाला सत्ता गेल्याच दुःख नाही, कारण भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळं खासदारांची संख्या दोनवरुन ३०० पर्यंत पोहोचली आहे. भाजपला केंद्राची मदत घेण्याची गरज नाही भाजपा सक्षम आहे,’ असं दरेकर यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times