मुंबई: शिवसेनेचा रंग आणि अंतरंग भगवा आहे आणि तो भगवाच राहणार आहे, असे मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज निक्षून सांगितले. शिवसेनेचा खरा चेहरा उघडा पडला अशी टीका भाजपकडून आमच्यावर होत आहे मात्र, प्रत्यक्षात भाजप हा अख्खा पक्षच उघडा पडला आहे, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज बीकेसी येथे आयोजित वचनपूर्ती मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. बाळासाहेबांसोबत काम केलेल्या ११ ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते उद्धव यांचा हा सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर छोटेखानी भाषणात उद्धव यांनी भाजपवर सडकून टीका केली व काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यामागचे कारण स्पष्ट केले.

रात्री दहाची मर्यादा ओलांडली?

उद्धव ठाकरे यांना तलवार भेट देण्यात आली व त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचाही सत्कार करण्यात आला. रश्मी ठाकरे यांची महिला शिवसैनिकांनी पारंपारिक पद्धतीने ओटी भरली. यावेळी मनोरंजनात्मक रंगारंग कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या दिमाखदार सोहळ्याने रात्री १० वाजताची सीमा मात्र ओलांडली. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना रात्रीचे १० वाजून गेले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here