इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमधील एरोड्रम पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. रुक्मिणी नगरात राहणाऱ्या कॉन्स्टेबल आणि त्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या करण्यात आली. कॉन्स्टेबल एसएएफमध्ये कार्यरत होता. त्यांची १६ वर्षांची मुलगी बेपत्ता आहे अशी माहिती समजते. या घटनेने इंदूरमध्ये खळबळ उडाली आहे.
दुहेरी हत्याकांडाची घटना समजताच, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांची तपास सुरू केला आहे. या प्रकरणी अधिक माहिती मिळू शकली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती देता येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पोलीस कॉन्स्टेबल ज्योती प्रसाद शर्मा आणि त्याची पत्नी नीलम यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी घरात आढळून आले. त्यामुळे परिसरात खळबळ माजली. दोघांना एक १६ वर्षांची मुलगी आहे. ती बेपत्ता आहे. प्रेम प्रकरणातून हे हत्याकांड घडले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस या घटनेची कसून चौकशी करत आहेत. घटनास्थळी एरोड्रम पोलीस आणि वरिष्ठ अधिकारीही आहेत. आजूबाजूच्या नागरिकांकडे चौकशी केली जात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times