एडिलेड: AUS vs IND 1st Test ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली कसोटी ही पिंक बॉलने डे-नाइट होत आहे. भारतीय संघ प्रथमच परदेशात डे-नाइट सामना खेळत आहे. डे-नाइड कसोटी मध्ये ऑस्ट्रेलिया संघाला सर्वाधिक अनुभव आहे. ऑस्ट्रेलियाने सात डे-नाइट सामने खेळले आहेत.

LIVE अपडेट (AUS vs IND 1st Test)
>> पहिल्या दिवसाचा खेळ संपला, भारत ६ बाद २३३>> हनुमा विहारी १६ धावांवर बाद, भारत ६ बाद २०६ >> भारताची पाचवी विकेट; अजिंक्य रहाणे ४२ धावांवर बाद, भारत ५ बाद १९६ >> भारताला मोठा धक्का विराट कोहली ७४ वर धावबाद, भारत ४ बाद १८८>> विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांची अर्धशतकी भागिदारी पूर्ण
>> विराट कोहलीचे अर्धशतक पूर्ण, कसोटीमधील २३वे अर्धशतक
>> दुसऱ्या सत्रात भारताच्या ३ बाद १०७ धावा >> ऑस्ट्रेलियाला मिळाली मोठी विकेट, पुजारा ४३वर बाद; भारत ३ बाद १००
>> चेतेश्वर पुजार आणि विराट कोहली यांची ५० धावांची भागिदारी >> पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राला सुरूवात
>> पहिल्या सत्राचा खेळ संपला, २५ षटकात भारताच्या २ बाद ४१ धावा (पुजारा-१७*, कोहली-५*)
वाचा- >> मयांक अग्रवाल १७ धावांवर बोल्ड, पॅट कमिन्सने घेतली विकेट; भारत २ बाद ३२
>> : पृथ्वी शॉ शून्यावर बाद, पहिल्याच ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर भारताची पहिली विकेट

>> नाणेफेक जिंकल्यानंतर विराटची कर्णधार म्हणून कसोटीतील कामगिरी

सामने- २६
विजय- २१
पराभव- ०
ड्रॉ- ४

>> भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

असा आहे भारतीय संघ– विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (विकेटकिपर), आर अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी

ऑस्ट्रेलियाचा संघ- जो बर्न्स,मॅथ्यू वेड, मार्नस लाबुशाने, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, टीम पेन (कर्णधार आणि विकेटकिपर), कॅमरून ग्रीन, पॅट कमिंन्स, मिचेल स्टार्क, नाथन ल्योन आणि जोश हेजलवुड

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here