म. टा. प्रतिनिधी, : मेव्हणीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्याला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.आर. पटारे यांनी ७ वर्षे कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सिद्धार्थ ज्योतीराम आवळे (वय ४०, रा. आदर्शनगर) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे.

सिद्धार्थच्या पत्नीचा २०१३ मध्ये अपघाती मृत्यू झाला होता. त्याची मेव्हणी वंदना ही गाडी चालवत असताना हा अपघात झाला होता. त्यामुळे पत्नीच्या मृत्यूस वंदना जबाबदार आहे, असे त्याला वाटत होते. तसेच तिने आपल्यासोबत लग्न करावे असा आग्रह त्याने धरला होता. तिने त्याला वारंवार नकार दिला. पुढे तिचे लग्न ठरले. यामुळे त्याने रागाच्या भरात वंदनावर २ डिसेंबर २०१६ रोजी प्राणघातक हल्ला चढविला. यात ती गंभीररित्या जखमी झाली.

मानकापूर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०७ अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तपासाअंती आरोपपत्र दाखल केले. माजी जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी सरकारची, तर अॅड. अनिल काळे यांनी बचावपक्षाची बाजू मांडली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर न्यायालयाने या प्रकरणी आरोपीला दोषी ठरवित त्याला शिक्षा सुनावली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here