लोकसभेच्या अध्यक्षांनी या प्रकरणाची दखल घेऊन संसदीय स्थायी समितीच्या बैठकांमध्ये निवडून आलेल्या खासदारांना मोकळेपणाने आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार संरक्षित करावा असा आग्रह या पत्रात करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समितीच्या बैठकीवेळी आपल्याला बोलण्याची परवानगी देण्यात आली नाही, असा आरोप करत या बैठकीत आपण राष्ट्रीय संरक्षण विषयाशी संबंधित मुद्दे मांडू इच्छित होतो, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.
गंभीर राष्ट्रीय संरक्षण विषयी मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी या बैठकीत गणवेशावर चर्चा करत वेळ वाया घालवला जात असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह बैठकीतून वॉकआउट केला होता.
या बैठकीत राहुल गांधी यांना लडाखमध्ये चीनी आक्रमकता, सैनिकांसाठी उत्तम उपकरणे उपलब्ध करणे आदी मुद्दे मांडायचे होते, मात्र समितीचे अध्यक्ष जुएल उरांव (भाजप) यांनी त्यांना बोलण्याची परवानगीच दिली नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. बोलण्याची अनुमती न मिळाल्याने मग राहुल गांधी यांनी बैठक सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतला.
क्लिक करा आणि वाचा-
यानंतर समितीच्या बैठकीत सहभागी असलेले काँग्रेसचे खासदार राजीव सातव आणि रेवंत रेड्डी हे देखील राहुल यांच्या सोबत बैठकीतून बाहेर गेले. राहुल गांधी गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारवर निशाणा साधत आहेत. दरम्यानच्या काळात राहुल गांधी हे संरक्षण प्रकरणांशी संबंधित संसदीय समितीच्या बैठकीला हजर राहत नाहीत, असा आरोप करत भाजपने त्यांच्यावर पलटवार देखील केला होता.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times