मुंबई:
अजय देवगण याच्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धम्माल केली आहे. या सिनेमाला महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी टॅक्स फ्री देखील केलं आहे. महाराष्ट्राच्या गावातले लोक मात्र या सिनेमाच्या निर्मात्यांवर नाराज आहेत. गोडोली हे मालुसरे यांचं जन्मगाव. मात्र या गावाचा सिनेमात उल्लेखच केला नसल्याने गावकरी नाराज आहेत.

तान्हाजीचा जन्म सातारा जिल्ह्यातील गोडोली गावात झाला होता. पण सिनेमात तान्हाजी कोकणातील उमरठ गावात राहणारा दाखवला आहे. आता हे गोडोलीचे गावकरी हा मुद्दा निर्मात्यांपर्यंत नेणार असल्याचे समजते.

एका गावकऱ्याने सांगितले की, ‘काही वर्षांपूर्वी गावातील मालुसरेंच्या घराचे अवशेष मिळाले होते. ते सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. गावांत त्यांचं स्मारक बनवण्यासाठी यातील काही अवशेषांचा वापर करण्यात येणार आहे. तान्हाजींचा जन्म गोडोली गावात झाला होता. कमीत कमी येथे घालवलेलं त्यांचं बालपण तरी सिनेमात दाखवायला हवं होतं. येथे सिनेमाचा काही भागही चित्रीत व्हायला हवा होता.’

तान्हाजीचा चुकीचा इतिहास जगाला दाखवला जात असल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here