पिंपरी: कारवाई टाळण्यासाठी तरुणीकडून महिला पोलिसाने पैसे स्वीकारल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून, संबंधित पोलिसाचा कसुरी अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. येथील शगुन चौकात नुकताच हा प्रकार घडला आहे. ( )

वाचा:

येथे कार्यरत असलेली एक महिला वाहतूक पोलीस शगुन चौकात अन्य सहकाऱ्यांसोबत कर्तव्य बजावत होती. दरम्यान, तिथे एका मोपेड दुचाकीवरून दोन तरुणी आल्या. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे संबंधित महिला वाहतूक पोलिसाने त्यांना सांगितले. ही कारवाई टाळण्यासाठी काही रक्कम घेण्याची तडजोड झाली आणि त्या वाहतूक महिला पोलिसाने ते पैसे थेट पॅन्टच्या मागच्या खिशात ठेवायला सांगितले. संबंधित तरुणीने हे पैसे महिला पोलिसाच्या खिशात ठेवले.

वाचा:

हा सगळा प्रकार कुणीतरी कॅमेऱ्यात कैद केला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तातडीने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. आम्ही वरिष्ठांकडे रिपोर्ट पाठवला आहे. त्यावर काय कारवाई होईल, हे वरिष्ठच ठरवतील, असे पिंपरी वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक यांनी याबाबत बोलताना सांगितले.

महिला कॉन्स्टेबल निलंबित

व्हिडिओच्या आधारे संबंधित महिला कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी अंतर्गत चौकशी करण्यात येणार असून घटनास्थळी नेमकं काय घडलं, याची पडताळणी केली जाईल, असे पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त यांनी सांगितले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here