म. टा. प्रतिनिधी, जळगावः मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत जळगाव या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी भोईटे गटाने अॅड. विजय पाटील यांना पुण्यात बोलावून चाकुचा धाक दाखवत मारहाण केली. तसेच याचवेळी व्हिडिओ कालवरुन यांनी एका कोटी रुपयांची ऑफर दिली. जानेवारी २०१८ मध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी ८ डिसेंबर रोजी निंभोरा पोलिस ठाण्यात गिरीष महाजन यांच्यासह भोईटे गटातील सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांमध्ये वाद आहेत. सुमारे पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत तानाजी भोईटे यांच्या गटाला नरेंद्र भास्कर पाटील यांनी निवडणुकीत पायउतार केल्यानंतरही भोईटे गट संस्थेवर ताबा सांगत असून दोन्ही गटांमध्ये आजवर अनेकदा संघर्ष झालेला आहे. या पार्श्‍वभूमिवर, मध्यंतरी भोईटे गटाला तत्कालीन मंत्री यांचा पाठींबा असल्याची चर्चा होती. याच अनुषंगाने दिवंगत नरेंद्र पाटील यांचे बंधू अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी निंभोरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी अॅड. विजय भास्करराव पाटील यांनी निंभोरा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार जानेवारी २०१८ मध्ये त्यांना निलेश भोईटे यांनी फोन करुन संस्थेचे जुने रेकॉर्ड देण्याबाबत सांगीतले. हे रेकॉर्ड तानाजी भोईटे यांच्याकडे असून ते सध्या पुण्यात आहेत. तुम्ही पुण्यात जाऊन त्यांची भेट घ्या व त्यांच्याकडून संस्थेचे जुने रेकॉर्ड घ्या असे निलेश भोईटे यांनी सांगीतले. यावेळी अॅड. पाटील यांनी मोठे बंधु नरेंद्र पाटील यांच्याशी बोलुन तीन-चार दिवसानंतर रेकॉर्ड घेण्यासाठी महेश आनंदा पाटील यांच्यासह कारने पुण्याला गेले. तानाजी भोईटे यांनी पाटील यांना कोथरुड परिसरातील हॉटेल किमया येथे बोलावले. या ठीकाणी तानाजी भोईटे, निलेश भोईट, शिवाजी भोईटे, विरेंद्र भोईटे, रामेश्वर नाईक हे थांबलेले होते. यावेळी तानाजी भोईटे यांनी ही संस्था गिरीष भाऊला हवी आहे, भाऊ एक कोटी रुपये देण्यास तयार आहेत’ असा निरोप दिला. अॅड. पाटील यांनी नकार दिल्यानंतर रामेश्वर नाईक याने स्वत:च्या मोबाईलवरुन गिरीश महाजन यांना व्हिडीओ कॉल केला. ‘तु सर्व संचालकांचे राजीमाने घेऊन ही संस्था निलेश भोईटेच्या ताब्यात देऊन टाक, तुझा विषय संपवुन टाक’ असे महाजन यांनी व्हिडीओ कॉलवर अॅड. पाटील यांना सांगीतले. ही बाब मान्य नसल्यामुळे अॅड. पाटील व महेश पाटील तेथुन जाण्यासाठी निघाले असता भोईटे यांनी त्यांना थांबवले. नाराज होऊ नका तुम्हाला रेकॉर्ड देऊन टाकतो असे सांगुन कारमध्ये बसवून त्यांना दुसऱ्या जागी नेण्याचा प्रयत्न केला. काही अंतरावर जयवंत भोईटे, निळकंठ काटकर, गणेश कोळी उर्फ गणेश मेंबर, सुनिल झंवर, विराज भोईटे हे देखील उभे होते. धावत्या कारमध्ये रामेश्वर नाईक याने अॅड. पाटील यांना चापट मारुन गळ्यावर चाकु लावुन धाक दाखवला.

यानतंर यानंतर सुनिल झंवर याने संस्था सोडुन द्या. मुकाट्याने सर्व संचालकांचे राजीनामे घेवुन निलेश कडे देवुन टाक अन्यथा परिणाम वाईट होतील. गिरीशभाऊंनी यांना बसविले आहे. हे तुला माहित नाही का ? गिरीषभाउंचा खास माणुस आहे. यावेळी विरेंद्र भोईटेने मला पायावर लाथ मारली व नरेंद्रला सांग सर्व संचालकांचे राजीनामे दया. रामेश्‍वरने पुन्हा माझ्या कानशिलात मारली व हरामखोर,भडव्या असा तयार होणार नाही याला एमपीडीए लावू अशी धमकी दिली, अशी फिर्याद अॅड. पाटील यांनी दिली आहे. त्यानुसार निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आता तो गुन्हा कोथरुड पोलिस ठाण्यात वर्ग झाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here