पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत भव्य राम मंदिराचं बांधकाम सुरू केलं आहे, हे विरोधकांना सहन होत नाहीए. म्हणूनच ते शेतकऱ्यांची दिशाभूल करून आंदोलन करत आहेत, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
अयोध्येत भव्य राम मंदिर व्हायला हवे की नको, तुम्ही सांगा? मोदींनी हे योग्य काम केलं आहे की नाही? तुम्ही पाठिंबा देताय का? मग बोल…. जय श्री राम, असं शेतकऱ्यांना संबोधित करता योगी म्हणाले.
‘काश्मिरमधील कलम ३७० रद्द केल्याने विरोधक नाराज आहेत. यामुळे ते शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत आणि सरकारविरोधात आंदोलन करण्यासाठी शेतकऱ्यांना चिथावत आहेत. कलम ३७० रद्द झाल्याने काश्मीरमधील फुटीरतावाद संपेल आणि तिथे तुम्हाला जमीनही खरेदी करता येईल. पंतप्रधान मोदींनी तुम्हाला जो अधिकार दिला आहे ते चांगलं काम आहे ना? पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करणार ना? मग बोला भारत माता की जय’, असं म्हणत योगींनी विरोधकांवर निशाणा साधला.
नवीन कृषी कायद्यांमुळे खासगी क्षेत्रातील स्पर्धा वाढेल आणि शेतकऱ्यांच्या मालाला अधिक दर मिळेल. शेतकऱ्यांचा फायदा होईल. शेतकरी आपला माल कृषी उत्पन्न बाजार समिती शिवाय बाहेरही विकू शकेल, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times