देशातील उद्योगांकडून २७ हजार कोटींची खरेदी
संरक्षण संरक्षण राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषदने (DAC) देशांतर्गत उद्योगांकडून २७ हजार कोटी रुपयांची शस्त्रास्त्रे आणि उपकरणांच्या खरेदीस मान्यता दिली. संरक्षण मंत्रालयाच्या खरेदीचा निर्णय घेणाऱ्या डीएसीने एकूण ९ प्रस्तावांना मंजुरी दिली. २८,००० कोटी रुपयांच्या ७ प्रस्तावांपैकी प्रस्तावांचे ६ प्रस्ताव हे २७,००० कोटी रुपयांचे आहेत. यामुळे मेक इन इंडिया आणि आत्मनिरीभर भारतला चालना देण्यासाठी भारतीय उद्योगास AoN (अॅक्सेप्टन्स ऑफ नेससिटी) दिली जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
AWA&C विमानं खरेदीचाही समावेश
हवाई दलासाठी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO) तयार केलेले एअरबोन अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम (एडब्ल्यू अँड सीएस)-आधारित विमान, नौदलासाठी नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल व्हेसेल आणि लष्करासाठी मॉड्यूलर ब्रिज खरेदी प्रस्तावांचा समावेश आहे.
सीमेवर पाळत ठेवण्यास मदत होणार
हवाई दलासाठी तयार करण्यात येणारे ६ नवीन विमानांमुळे पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर पाळत ठेवण्यास मदत होईल. डीआरडीओ एअर इंडिया विमानांमध्ये ही नवीन एअरबोन अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल (एडब्ल्यू अँड सी) यंत्रणा विकसित करेल. यामुळे देशातील संरक्षण उद्योगांना चालना यातून मिळण्यास मदत होईल.
दारूगोळा साठवण्याची सूट
दारूगोळ्यांच्या संदर्भात सरकारने सैन्यातील तिन्ही दलांना १५ दिवसांचा दारूगोळा आणि शस्त्रास्त्रांचा साठा करण्याची परवानगी दिली आहे. आतापर्यंत भारतीय सैन्य हे युद्धासाठी १० दिवसांसाठी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा साठा करत होते. एलएसीवरील तणावाच्या स्थितीत हा निर्णय खूप महत्वाचा आहे. यामुळे सैन्याला आवश्यकतेनुसार साठा आणि आपत्कालीन आर्थिक अधिकरांचा वापर करता येईल. देशाव्यतिरिक्त परदेशातूनही ५० हजार कोटींची शस्त्रे खरेदी करण्याची योजना होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times