यापूर्वी २ डिसेंबरला दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.७ इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू गाझियाबादमध्ये होता. पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी हा भूकंप झाला होता. यावर्षी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के बर्याच वेळा जाणवले आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये एप्रिलनंतर १५ पेक्षा जास्त वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. यावेळी भूकंपाचे केंद्रबिंदू दिल्लीच्या जवळपासच्या भागात होते.
दिल्ली आणि आसपासच्या भागात कोणत्याही वेळी मोठा भूकंप येऊ शकतो, अशी शंका देशातील ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. भूकंपावर देखरेख ठेवणारी नॅशनल सेंटर ऑफ सिस्मोलॉजी ही देशातील सर्वोच्च संस्था आहे. गेल्या काही महिन्यांत दिल्लीमध्ये अनेक वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत, असं या संस्थेने म्हटलं आहे.
कधीही मोठा भूकंप होऊ शकतो
दिल्ली-एनसीआरमध्ये केव्हाही मोठा भूकंप होण्याची भीती जवाहरलाल नेहरू सेंटर ऑफ अॅडव्हान्स सायटिंफिक रिसर्च संस्थेतील प्राध्यापक सीपी राजेंद्रन यांनी व्यक्त केली आहे. भूकंप केव्हा येईल आणि तो किती मोठा असेल, हे सांगणं कठीण आहे, असं एका एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत राजेंद्रन यांनी म्हटलंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times