म. टा. वृत्तसेवा,
एका राजकीय नेत्याच्या प्रतिमा लावून जादूटोणा केल्याचा प्रकार जव्हारमध्ये समोर आला. जादूटोणा करणाऱ्यांना उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलिस ठाणे हद्दीतील कऱ्हे तलावली येथून अटक करण्यात आली.

विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलिस ठाणे हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये या राजकीय नेत्याची प्रतिमा लावून अनिष्ट अघोरी प्रथांचा वापर करण्यात आला. याप्रकरणी दोघांना स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली. या व्यक्ती अघोरी जादूटोणा करून लोकांना फसवत असून त्यांच्याकडून पैसेही उकळत असल्याचे सांगितले जात आहे. अटक केलेले कृष्णा बाळू कुरकुटे व संतोष मगरू वारडी यांच्यावर जव्हार पोलिस ठाण्यात फसवणूक व महाराष्ट्र नरबळी, अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा, नोंदवण्यात आला. यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध पोलिसांनी घ्यावा. राजकीय स्पर्धेपोटी जिवाशी खेळ सुरू आहे का, असा संशय व्यक्त होत आहे, असे या राजकीय नेत्याचे समर्थक राम रेपाळे यांनी सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times