मुंबई: मनसेबाबतची कोणतीही गोष्ट फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीडियावर टाकू नका. सोशल मीडियावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी टाकलेली कमेंट खपवून घेतली जाणार नाही. सोशल मीडियावर जो पदाधिकारी मनसेबाबतची कमेंट टाकेल त्याची पदावरून हकालपट्टी करण्यात येईल, अशी तंबीच यांनी सैनिकांना दिली.

सोशल मीडियावरील ट्रोलिंगमुळे राज ठाकरे यांनी मनसे सैनिक आणि पदाधिकाऱ्यांना ही तंबी दिली. तुमच्या मनातील कोणतीही भावना मनसेच्या नावाने सोशल मीडियावर पोस्ट करू नका. मनसेची अधिकृत भूमिका म्हणून कोणत्याही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करू नका. तुमचे वाद, भांडण आणि तक्रारीही सोशल मीडियावर टाकू नका. तुमच्या भावना पक्षातील नेते आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसमोर व्यक्त करा. फेसबुक काय आणि ट्विटर काय ही भावना व्यक्त करण्याची जागा नाही. त्यामुळे सोशल मीडियावर मनसेबाबत लिहिणाऱ्यांना पदावरून काढून टाकण्यात येईल, अशी तंबीच राज यांनी दिली. अनेकदा नेते आणि कार्यकर्ते समवयस्क असतात. असं असलं तरी त्या नेत्याच्या किंवा पदाधिकाऱ्याच्या पदाचा मान राखलाच पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

मनसेचं शॅडो कॅबिनेट

राज्य सरकारच्या प्रत्येक मंत्र्यांच्या खात्यावर वॉच ठेवण्यासाठी शॅडो मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी केली. मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांचं हे शॅडो मंत्रिमंडळ असेल. हे पदाधिकारी राज्य मंत्रिमंडळातील सर्व खात्यांवर लक्ष ठेवण्याचं काम करेल. सरकार योग्य पद्धतीने काम करतंय की नाही हे पाहण्याचं काम या शॅडो मंत्रिमंडळाचं असेल. उद्या राज्यात आपलं सरकार आलं तरीही हे शॅडो मंत्रिमंडळ कार्यरत राहील, असंही राज यांनी सांगितलं.

संघटना बांधणीसाठी नवा सेल

एखाद्या गोष्टीत यश मिळालं की त्याचं श्रेय घेण्यासाठी अनेक बाप जन्माला येतात. यशाला अनेक बाप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात. वाईट दिवस आले की सल्ले देऊ लागतात. ठिक आहे. प्रत्येकाला काही तरी सांगावंसं वाटतं म्हणून ते सांगतात. हरकत नाही, असं सांगतनाच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी नवीन सेल निर्माण करण्यात येत आहे. ज्या कुणाला निवडणूक न लढवता पक्ष संघटनेसाठी काम करायचं असेल त्यांनी राजगडावर येऊन स्वत:च्या नावाची नोंदणी करावी. बारामतीचे पाठक सर आणि वसंत फडके यांच्याकडे या सेलची जबाबदारी देण्यात आली आहे. संघटनात्मक रचना अधिक घट्ट करण्याची जबाबदारी यांच्यावर राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

२५ मार्चला राजकीय भाष्य करणार

येत्या ९ मार्च रोजी मनसेला १४ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आज अधिवेशन बोलावण्यात आलं. तशीही अधिवेशनाची परंपरा कमी होत आहे. त्यामुळे हे अधिवेशन बोलवण्यात आलं आहे, असं सांगतानाच आज मी जास्त काही बोलणार नाही. येत्या २५ मार्च रोजी गुडीपाडवा आहे. त्यावेळी शिवतीर्थावर जाहीर सभा होईल. या सभेत राजकीय भाष्य करून अनेकांचे बुरखे फाडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here