आरे कांजूरमध्ये स्थलांतरित केल्यानंतर भाजप नेत्यांनी ठाकर सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता कांजूरमधील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती मिळाल्यानंतर भाजपनं तर सरकारला कोंडीत पकडण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला आहे. भाजप नेते व न्यायालयाच्या निर्णयावर संजय राऊत यांनीदेखील नाराजी व्यक्त केली असून मेट्रो कारशेडचा विषय विरोधी पक्षानं राजकीय केला असून त्यात न्यायालयाने पडू नये आणि ते योग्य आहे. असं वक्तव्य केलं होतं. राऊतांच्या या वक्तव्यांवरून भाजप पुन्हा आक्रमक झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनीही राऊतांच्या त्या विधानाचा संदर्भ देत जोरदार टीका केली आहे.
‘घटनेच्या चौकटीतील गोष्टी मानव्या लागतील. एखाद्या घटनेसंदर्भात न्यायालयात जायचे नाही का? यांना निवडणूक आयोग आणि कोर्टाचे निर्णय मान्य नाहीत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. शिवाय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवर देशाचा कारभार उत्तम सुरु आहे आणि पुढेही सुरु राहिल. हे सर्व तुम्हाला मान्य नाही का?,’ असा बोचरा सवालही त्यांनी केला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
न्यायालय हल्ली कशातही पडत आहे. खालच्या न्यायालयाला डावलून एका खुनी माणसाला वरचं न्यायालय जामीन देते. बेकायदा बांधकाम तोडण्यासंदर्भात कारवाई केली तर सरकारलाच बेकायदेशीर ठरवतात. देशाच्या न्यायव्यवस्थेला आम्ही असं कधी पाहिलं नव्हतं, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times