पणजी: नाताळ () काही दिवसांवर येऊन ठेपला असून गोव्यात नाताळ आणि नव्या वर्षाच्या () स्वागताची तयारी सुरू आहे. या दिवसांमध्ये गोव्यात गोमांसाला (Beef) मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र या दिवसांमध्ये भाजपचे राज्य असलेल्या गोव्यात () जाणवत आहे. याची चिंता गोव्याचे मुख्यमंत्री (Pramod Sawant) यांनी सतावत असून गोमांसाचा पुरवठा वाढेल कसा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. ‘गोवा राज्यात गोमांसाची कमतरता असल्याची जाणीव आम्हाला असून ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही लवकरच पावले उचलू, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.

मांस विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, नाताळ आणि नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर गोमांसाची मागणी वाढलेली आहे. खरे तर कर्नाटकात गोमांसाची कमतरता निर्माण झाल्यामुळे गोव्यात देखील गोमांसाचा तुडवडा जाणवू लागला आहे.

ऐन सण, उत्सव आणि नव्या वर्षाच्या आगमनाच्या दिवसांमध्ये गोमांसाचा तुटवडा असल्याची जाणीव गोवा सरकारला असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे. लवकरच हा तुटवडा दूर करण्याचा मार्ग सापडेल, असेही ते म्हणाले. राज्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

या संदर्भात आपण पशुपालन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हे संकट दूर करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा केली, अशी माहिती सावंत यांनी दिली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार चर्चिल अल्मेडो यांनी राज्यात गोवा मीट कॉम्प्लेक्स लिमिटेडमध्ये पुन्हा कत्तलखाना सुरू करण्याची मागणी केलेली आहे.

भारतीय जनता पक्षाचे सरकार असलेल्या गोवा राज्यात कत्तलखान्यातील कसायांवर प्रतिबंध लावण्यात आला. मात्र, कत्तलखान्यांना काही प्रमाणात बैल आणि म्हशी मारण्याची परवानगी देण्यात आली होती. शुक्रवारी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कत्तलखाना पुन्हा सुरू करण्याची विनंती करणार असल्याचे अल्मेडो यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-
गोवा मीट कॉम्प्लेक्स लिमिटेडमध्ये कत्तलखाना गेल्या ५ वर्षांपासून बंद आहे. या ठिकाणी मांसाच्या विक्रीसाठी एका दिवसाला २०० जनावरे मारण्याची व्यवस्था आहे, असे अल्मेडो म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here