एडिलेड: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या डे-नाइट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. भारताने पहिल्या दिवशी ६ बाद २३३ धावा केल्या होत्या. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ७४ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या अखेरच्या चार फलंदाजांना फक्त ११ धावा करता आल्या. भारताचा पहिल्या डाव २४४ धावांवर संपुष्ठात आला.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया LIVE अपडेट ()>> ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाला सुरूवात
>> ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताचा २४४ धावांवर ऑल आउट, शेवटच्या ४ विकेट ११ धावात पडल्या
>> भारताची ९वी विकेट, उमेश यादव बाद, भारत ९ बाद २४०
>> ९१व्या ओव्हरमध्ये वृद्धीमान साहा मिचेल स्टार्कच्या चेंडूवर बाद
>> दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये भारताची विकेट, आर अश्विन १५ धावांवर बाद
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times