म.टा.प्रतिनिधी, नगर: राष्ट्रवादीचे आमदार यांच्या मतदारसंघातील कर्जत आणि जामखेड या शहरांनी ‘स्वच्छ सर्वेक्षणात’ भाग घेतला आहे. या स्पर्धेत नामांकन मिळवण्याचा निर्धाराने नागरिकांकडून गेल्या ७५ दिवसांपासून श्रमदान मोहिम राबवण्यात येत आहे. यामध्ये रोहित पवार यांच्या मातोश्री देखील सहभागी होत आहे. त्यामुळे आपल्या आई बद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, अशी भावूक प्रतिक्रियाच पवार यांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारचे नगरपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण ही स्पर्धा असते. या स्पर्धेत कर्जत, जामखेड या शहरांनी भाग घेतला आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नामांकन कसे मिळेल? याबाबत येथील नागरिकांमध्ये चांगलीच जागरूकता निर्माण झाली असून गेल्या ७५ दिवसांपासून येथे श्रमदान मोहिम सुरू आहे. या श्रमदान मोहिमेमध्ये रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार या देखील सहभागी होत असून याची सविस्तर माहितीच पवार यांनी सोशल मीडियावर दिली आहे.

पवार यांनी म्हटलं आहे की, ‘माझ्या मतदारसंघातील कर्जत आणि जामखेड या शहरांनी ‘स्वच्छ सर्वेक्षणात’ भाग घेतला असून या स्पर्धेत नामांकन मिळवण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे. त्यासाठी दोन्ही शहरातील प्रत्येक घटकातील नागरिक जोमाने काम करत आहेत. दररोज एक तास श्रमदान करुन सार्वजनिक ठिकाणचा केर-कचरा साफ केला जातोय. सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, नागरिक, युवा, विद्यार्थी, महिला भगिनी, शासकीय कर्मचारी हे आपलं स्वतःचं काम आहे, असं समजून शहराच्या वेगवेगळ्या भागात दररोज एक तास राबविण्यात येणाऱ्या या स्वच्छता मोहिमेत योगदान देत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून ही दोन्ही शहरं चकाचक दिसू लागलीत, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.’या श्रमदान मोहिमेत दोन दिवस मीही सहभागी झालो, परंतु माझी आई (सौ. सुनंदाताई पवार) यासाठी खूप मेहनत घेत आहेत. पहिल्यापासून त्या या मोहिमेचा एक महत्वाचा घटक आहेत, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे,’ असे म्हणतानाचं त्यांनी आईबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे.

‘सलग राबविण्यात येणाऱ्या या श्रमदान मोहिमेला दोन दिवसांपूर्वी ७५ दिवस पूर्ण झाले. श्रमदानाचा हा ७५ वा दिवस कर्जत शहरात स्वच्छता जनजागृतीसाठी ‘मशाल रॅली’ काढून साजरा केला. या रॅलीत माझ्या आईसह अनेक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, राजकीय पक्षातील प्रमुख नेते मंडळी, विद्यार्थी, व्यापारी, कामगार, अधिकारी, महिला, शिक्षक, युवा यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वच्छतेचा जागर केला. या स्वच्छता मोहीमेत समाजातील सर्वच घटक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. ही मोहीम आज एक लोकचळवळ बनून यशाकडं मार्गक्रमण करत आहे. हे सगळं पाहता स्वच्छ सर्वेक्षणात माझ्या मतदारसंघातील कर्जत आणि जामखेडला या शहरांना नामांकन मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण स्वच्छतेचं एक ‘कर्जत-जामखेड मॉडेल’ही बनेल जे राज्याला दिशादर्शक असेल,’ असा विश्वास देखील रोहित पवार यांनी वाटत असल्याचे स्पष्ट केले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here