मुंबई: मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी बुधवारी एका ३० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. २४ वर्षीय तरुणी पूर्वेकडील वर्दळीच्या रस्त्याने जात असताना, तिचा पाठलाग करून केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. गेल्या नऊ वर्षांत त्याला अशाच प्रकारच्या गुन्ह्यांत पोलिसांनी १२ वेळा अटक केली आहे.

कल्पेश देवधरे असे या ३० वर्षीय आरोपीचे नाव असून, तो पश्चिमेकडील रहिवासी आहे. तो चालक आहे. मुंबईत त्याने अशाच प्रकारचे अनेक गुन्हे केले असून, गेल्या नऊ वर्षांत त्याला पोलिसांनी १२ वेळा अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ११ डिसेंबर रोजी मालाड पूर्वेकडील रस्त्यावर कल्पेशने २४ वर्षीय तरुणीचा विनयभंग केला. ती लग्नाच्या खरेदीसाठी जितेंद्र रोडने जात होती. कल्पेशने तिचा पाठलाग केला. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तुझ्या बाबांना ओळखत असून, त्यांची प्रकृती कशी आहे, अशी विचारणा त्याने तिला केली. मात्र, माझे बाबा हयात नाहीत, असे तिने सांगितले. त्यानंतर अचानक त्याने दुचाकी थांबवली आणि तिला मिठी मारली. तसेच चुंबन घेण्यास सुरुवात केली. तरुणीने त्याला ढकलून दिले. तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर आरोपी तेथून पसार झाला. पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर तपास सुरू केला. आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here