मुंबईः राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. अलीकडेच, राष्ट्रवादीचे आमदार यांनी भाजपचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केला होता. यावरूनच भाजप नेते यांनी पवारांना ८० तासांच्या सरकारची आठवण करुन देत टोला लगावला आहे.

विधानसभा निवडणूकांनंतर अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं होतं. अजित पवारांचं बंड आणि पहाटेचा शपथविधी याची फारकाळ चर्चादेखील रंगली होती. अखेर अजितदादांनी साथ सोडल्यानं हे सरकार ८० तासांत फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या सत्तानाट्याला आता एक वर्ष उलटून गेल्यानंतरही भाजप या घटनेवरुन महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. निलेश राणे यांनीही त्या घटनेचं उदाहरण देत अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

निलेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. अजित पवार म्हणतात जे आमदार भाजपामध्ये गेले त्यांनी परत या, आम्ही त्यांना निवडून आणतो. ज्यांना शपथविधीनंतर स्वतःचे आमदार टिकवता आले नाही. ते आमदारांना परत निवडून आणण्याची भाषा करत आहेत,’ असा टोला लगावला आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

विधानसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना अजित पवारांनी पुन्हा माघारी येण्याची साद घातली आहे. जे कुणी भाजपचा व आमदारकीचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांना तिन्ही पक्ष मिळून निवडून आणण्याचा प्रयत्न करतील, असा विश्वासही अजित पवार यांनी दिला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here