इस्लामाबाद: बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे. काही महिन्यांपूर्वी पीठाच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. आता, भाज्यांच्या किंमती गगनला भिडल्या आहेत. रावळपिंडीत ग्राहकांना एक किलो आलं हजार रुपयांना मिळत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची माजी पत्नी रेहम खान यांनी एका वृत्तवाहिनीचा व्हिडिओ ट्विट केला आहे.

पाकिस्तानमधील जनतेला मागील काही दिवसांपासून महागाईचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानमध्ये शिमला मिर्चीची किंमत २०० रुपये किलो इतकी झाली आहे. या वाढत्या गरिब आणि निम्न मध्यमवर्गीयांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. पाकिस्तानमध्ये सध्या खाद्यान्न संकट निर्माण झाल्याची स्थिती आहे. पाकिस्तानमध्ये कांद्याचे उत्पादनही कमी झाले आहे. त्यामुळे इतर देशांकडून कांदा मागवावा लागत असल्याची परिस्थिती आहे. तर, साखरेचे भावही वधारलेलेच आहेत. वाढत्या महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान सातत्याने बैठका घेत आहेत.

वाचा:

इम्रान खान यांच्याकडून स्वत:चे कौतुक
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करून साखरेचे भाव कमी झाल्याबद्दल स्वत:चे कौतुक केले होते. पाकिस्तानमध्ये साखरेचे भाव सध्या ८१ रुपये प्रति किलो आहे. सरकारने आखलेल्या उपाययोजनांमुळे साखरेचे भाव १०२ रुपये प्रति किलोवरून ८१ रुपयांवर आले असल्याचे खान यांनी म्हटले होते. दर कमी झाल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांचेही कौतुक केले.

वाचा: वाचा:
विरोधकांशी दोन हात करताना महागाईकडे दुर्लक्ष?
इम्रान खान यांच्याविरोधात पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी डेमोक्रॅटीक मुव्हमेंट या नावाखाली दंड थोपटले आहे. सरकारविरोधाील जाहीर सभांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर विविध कलमाखाली कारवाईदेखील सुरू आहे. त्यामुळेच विरोधी पक्षांच्या नेत्यांवर चाप लावण्याच्या नादात इम्रान खान यांनी जनतेला वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप होत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here