रत्नागिरीः रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले समुद्राकिनारी सहा पर्यटक बुडाल्याची घटना आज घडली आहे. या सहा पर्यटकांपैकी तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. स्थानिकांच्या मदतीने बुडालेल्या तिघांना समुद्र किनारी सुखरुप आणण्यात यश आलं आहे.

मिशन बिगिन अतंर्गत राज्यातील पर्यटन स्थळही खुली करण्यात आली आहे. त्यातच, नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळांवर गर्दीही होत आहे. पर्यटकही फिरण्यासाठी समुद्रकिनारी जात आहेत. असेच पुण्यातील सहा जण रत्नागिरीतील तालुक्यात असलेल्या आंजर्ले या सुमद्रकिनारी आले होते. दुपारच्या वेळी समुद्रात पोहण्यासाठी ते पाण्यात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं हे सहाही जण पाण्यात बुडाले.

स्थानिक नागरिकांच्या ही घटना निदर्शनास येताच त्यांनी प्रसंगावधान राखत या पर्यटकांना वाचवण्यासाठी धाव घेतली. स्थानिक नागरिकांना फक्त तिघांनाच वाचवता आले व इतर तीन पर्यटक पाण्यात बेपत्त झाले होते. पोलिसांच्या मदतीने स्थानिकांनी बेपत्ता झालेल्या पर्यटकांचा शोध सुरु केला मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

स्थानिकांना तीन पर्यटकांना वाचवण्यात यश आलं असून त्या तिघांवर दापोलीच्या शासकिय रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. दापोली पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून याबाबत अधिक तपास सुरु आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here