भारतात लस निर्मितीबाबतची माहिती रशियाने दिली आहे. भारतातील चार औषध कंपन्यांसोबत रशियाने चर्चा केली आहे. भारतात लस उत्पादन व्हावे अशी आग्रही भूमिका याआधीपासून रशियाने मांडली होती. रशियाच्या थेट गुंतवणूक निधीचे प्रमुख किरील दिमित्रेव यांनी सांगितले की, २०२१ मध्ये भारतात रशियन लशीचे जवळपास ३० कोटी डोसची निर्मिती करणार आहे. त्यासाठी आम्ही चार औषध कंपन्यांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पुढील वर्षात रशियन लशीचे भारतात ३० कोटी डोसचे उत्पादन होणार आहे.
वाचा:
लस विकसित करणाऱ्या गोमालिया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडीमियॉलजी अॅण्ड मायक्रोबायलॉजीने केलेल्या दाव्यानुसार करोनाने गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर ही लस १०० टक्के प्रभावी ठरली आहे. तर, करोनाच्या विरुद्ध ही लस ९१.५ टक्के प्रभावी आहे. लस चाचणी डेटातून उपलब्ध माहितीच्या विश्लेषणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. लस चाचणीच्या पहिल्या कंट्रोल पॉईंटमध्ये लस ९२ टक्के प्रभावी आढळून आली होती. तर, दुसऱ्या कंट्रोल पॉईंटमध्ये ९१.४ टक्के प्रभावी असल्याचे समोर आले होते. करोनाने गंभीर आजारी असलेल्या बाधितांवर रशियाची स्पुटनिक व्ही लस १०० टक्के प्रभावी ठरणार असल्याचे चाचणीत आढळून आले आहे.
वाचा: वाचा:
लस चाचणीची माहिती, संशोधन लवकरच वैद्यकीय नियतकालिकेत प्रकाशित केला जाणार आहे. त्यानंतर जगभरातील देशांमध्ये स्पुटनिक व्ही लशीच्या नोंदणीसाठी एक अहवाल तयार करण्यात येणार आहे. जेणेकरून संबंधित देशांमध्ये लस वापरास परवानगी मिळवण्याची प्रक्रिया सुरू करता येणार आहे. सध्या भारतात स्पुटनिक व्ही लशीची चाचणी सुरू आहे. ही चाचणी डॉ. रेडीज लॅबोटरीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. लवकरच या चाचणीचे परिणाम येण्याची शक्यता आहे.
दरम्यान याआधी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या ब्रिक्स देशांच्या संमेलनात विकसित करण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते. रशियाने विकसित केलेल्या स्पुटनिक व्ही या लशीचे उत्पादन भारत आणि चीन या सदस्य देशांमध्ये सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. या देशांमध्येच लशीचे उत्पादन सुरू झाल्यानंतर देशांतर्गत आवश्यक मागणीची पूर्तता होईल आणि हे देश इतर देशांनाही लशीचा पुरवठा करू शकतील, असेही पुतीन यांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times