या फोटोत नेहा बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत आहे. आता नेहा कक्कर आई होणार असल्याचंच साऱ्यांना वाटलं. अनेकांनी तिला सोशल मीडियावर शुभेच्छा द्यायलाही सुरुवात केली. पण लग्नाच्या दोन महिन्यांनंतर लगेच ही गुड न्यूज देणाऱ्या नेहा कक्करवर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत..
बातमी लिहेपर्यंत नेहाच्या या पोस्टला आतापर्यंत २२ लाख लाइक्स मिळाले आहेत. तर लाखो चाहत्यांनी तिला आई होण्यासाठीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. नेहाचा भाऊ टोनी कक्कडने कमेन्ट करत लिहिलं की, ‘मी मामा होणार.’ अवघ्या चार तासांपूर्वी शेअर केलेला हा फोटो सध्या मीम्ससह इण्टरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
नेहाने २४ ऑक्टोबरला रोहनप्रीतशी लग्न केलं. नेहाने रोहनप्रीतसोबतच्या प्रेमाचा स्वीकार ते लग्नाचा निर्णय या सर्वाची घोषणा सोशल मीडियावरच केली होती. रोहनप्रीत आणि ती नात्यात असण्यालं जेव्हा नेहाने सांगितलं त्याच्या काही दिवसांनंतरच नेहाने लग्नही केलं. नेहा आणि रोहनप्रीतच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times