मुंबईः करोना संकटामुळं राज्याच्या आर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. त्याचबरोबर निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी या संकटांमुळंही राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. यावरुनच राज्य सरकारकडून वेळोवेळी केंद्रानं जीएसटीचे पैसे थकवल्याचा आरोप वारंवार होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार यांनीही या मुद्द्यावर एक ट्विट केलं आहे.

रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे. निवडणूक डोळ्यांपुढं ठेवून २०१५-१६मध्ये तत्कालीन राज्य सरकारच्या घाईघाईत ३२९० कोटी रुपयांचा एलबीटी माफ करण्याच्या चुकीमुळं राज्याचं २८००० कोटींपेक्षा अधिक नुकसान झालं. ही चूक झाली नसती, तर यंदा अंत्यत अडचणीच्या वर्षात आपल्याला भरपाईपोटी ६३०० कोटीपेक्षाही अधिक निधी मिळाला असता, असं म्हणत रोहित पवारांनी पु्न्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

जीएसटी भरपाईचे पैसे हे आपल्या हक्काचे आहेत, कारण आपण स्वतः नुकसान सोसून आपला कर जमा करण्याचा हक्क केंद्र सरकारला दिलाय. हक्काच्या जीएसटी भरपाईच्या पैशासाठी विरोधी पक्षासह सर्वांनी एकत्र येऊन केंद्राकडे मागणी करायला हवी. कदाचित यामुळं पूर्वीच्या चुकांचं प्रायश्चित्त तरी घेता येईल, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here