मुंबई- लवकरच आई होणार आहे. सध्या ती गरोदरपणाचे हे निवांत दिवस चांगलेच एन्जॉय करताना दिसते. आतापर्यंत तिचे बेबी बम्पमधले अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. नुकताच अनुष्काने तिचा गरोदर होण्याअगोदरचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे या फोटोला तिने फार मजेशीर कॅप्शन दिलं आहे. तसंच गरोदरपणात ती सर्वात जास्त काय मिस करते तेही तिने सांगितलं.

मजेशीर कॅप्शनसह शेअर केला फोटो

अनुष्काने तिचा गुडघे दुमडून बसलेला फोटो शेअर करत म्हटलं की, या गरोदरपणात ती पाय वर करून गुडघे दुमडून बसायला फार मिस करते. ‘जेव्हा मी अशी बसून खायचे.. आता मी अशी बसू शकत नाही.. पण खाऊ मात्र शकते.’

जानेवारीमध्ये देणारा बाळाला जन्म
विराट आणि अनुष्काने ऑगस्ट महिन्यात ते आई- बाबा होणार असल्याची घोषणा केली होती. जानेवारीमध्ये त्यांच्या घरी नवीन पाहुणा येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. ११ डिसेंबर रोजी
आणि
यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस होता. या काळात विराट क्रिकेट सामन्यात व्यग्र होता तर अनुष्का मुंबईत होती. पण दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांचे फोटो शेअर करत लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

लग्नापूर्वी चार वर्ष होते रिलेशनशिपमध्ये

११ डिसेंबर २०१७ रोजी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी राजेशाही थाटात लग्न केलं. इटलीत त्यांनी डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. दोघं लग्नाआधी चार वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. यावर्षी ऑगस्टमध्ये दोघांनी सोशल मीडिया अकाउंटवर ते आई- बाबा होणार असल्याची बातमी शेअर केली. पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये अनुष्का तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here