‘सीएमएस-०१’ हा भारताचा ४२ वा दूरसंचार उपग्रह आहे. २०११ मध्ये अवकाशात सोडलेल्या ‘जीसॅट १२ आर’ या उपग्रहाची जागा तो घेईल. ‘फ्रीक्वेन्सी स्पेक्ट्रम’च्या विस्तारीत ‘सी-बॅंड’मध्ये सेवा पुरविण्याच्या उद्देशाने हा ‘सीएमएस-०१’ दूरसंचार उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. ‘विस्तारित सी-बँड’च्या व्याप्तीमध्ये भारतीय मुख्य भूभाग, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप बेटांचा समावेश असेल. ‘विकास कंटूर इंजिनां’ची निर्मिती करून ‘गोदरेज एअरोस्पेस’ने या मोहिमेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. प्रक्षेपणाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रक्षेपकाला गती देण्यासाठी आणि ‘इलिट थ्रस्टर’मध्ये ही इंजिने वापरण्यात आली होती.
यावेळी बोलताना ‘गोदरेज एअरोस्पेस’चे कार्यकारी उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख सुरेंद्र एम. वैद्य म्हणाले, “इस्रोशी भागीदारी करून तिच्या आणखी एका उपग्रहाच्या प्रक्षेपण मोहिमेमध्ये सहभागी होता आल्याचा आम्हाला अभिमान आहे. विकास कंटूर इंजिन आणि उपग्रह थ्रस्टर्स यांचे उत्पादन करून या प्रक्षेपणात त्यांचे योगदान आम्ही दिले, याचा आम्हाला आनंद आहे. भारताच्या अंतराळ कार्यक्रमांमध्ये स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून हातभार लावण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. जागतिक स्तरावर भारताच्या तांत्रिक प्रगतीला चालना देण्यासाठी या मोहिमा महत्वपूर्ण आहेत. ‘इस्रो’च्या भावी मोहिमांमध्ये आमचा सहभाग वाढण्याच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत.”
‘पीएसएलव्ही व जीएसएलव्ही रॉकेटसाठी लिक्विड प्रोपल्शन इंजिन’, ‘उपग्रहांसाठी थ्रस्टर’ आणि ‘अॅन्टीना सिस्टम’ यांसारख्या जटिल प्रणालींच्या उत्पादनात गोदरेज एअरोस्पेस कंपनी ‘इस्त्रोब’रोबर गेल्या ३ वर्षांहून अधिक काळ सहभागी आहे. ‘गोदरेज एअरोस्पेस’ने प्रतिष्ठित चंद्रयान आणि मंगलयान मोहिमांमध्येही अविभाज्य भूमिका बजावलेली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times