कोल्हापूर: राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर एका दिवसात धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणणाऱ्यांनी पाच वर्षात या समाजाला आरक्षण दिले नाही, तरीही आमदार झाले. मग ते कोणाचे चमचे आहेत म्हणून त्यांना हे बक्षीस मिळाले असा सवाल ग्राम विकास मंत्री यांनी केला. ( Latest News )

वाचा:

खासदार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांचे चमचे आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला होता. याबाबत विचारले असता मंत्री मुश्रीफ यांनी पडळकर यांचा खरपूस समाचार घेतला. सहा वर्षापूर्वी पडळकर यांनी बारामती येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन केले होते. या आंदोलनाला यांनी भेट देऊन त्यांचे कौतुक केले आणि भाजपचे सरकार येताच पहिल्याच दिवशी धनगर समाजाला आरक्षण देऊ अशी घोषणा केली होती. पण पाच वर्षे त्यांनी हे आरक्षण दिले नाही. मात्र, पडळकर विधान परिषदेवर आमदार झाले. आश्वासन पूर्ण केले नसतानाही त्यांना आमदारकी मिळाली यावरून ते कोणाचे चमचे आहेत हे स्पष्ट होते, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी पडळकरांना सुनावले. धनगर समाजाचा विश्वासघात केल्याचे बक्षीस म्हणून पडळकर यांना आमदार करण्यात आले आहे. साडी नेसून नौटंकी करणारे करणारे अनेकजण पवारांनी पाहिले आहेत. त्यांची दखल घेण्याची आम्हाला गरज नाही. पडळकर जरी बोलत असले तरी त्यांचा बोलविता धनी वेगळा आहे त्यांना आवरा, असा इशाराही मुश्रीफ यांनी यावेळी दिला.

वाचा:

नेमकी वादाची ठिणगी कशी पडली?

संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख फेकूचंद पडळकर असा केला होता. त्यावर संतप्त झालेल्या पडळकर यांनी राऊत यांना पत्र लिहून निशाणा साधला. मी आपणास खरेतर शरद पवार यांचा पंटर, खबऱ्या, चमचा असे म्हणायला हवे होते मात्र तो माझा संस्कार आणि संस्कृती नाही. प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे व प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे हे संस्कार मला माझ्या आईवडिलांनी दिले आहेत’, असे नमूद करत पडळकर यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिले होते. या वादात आता मुश्रीफ यांनीही उडी घेत पडळकरांना लक्ष्य केल्याने वाद अधिकच चिघळला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here