मुंबई:
सुप्रसिद्ध उद्योगपती यांनी गुरुवारी आपलं तारुण्यातील एक छायाचित्र इन्स्टाग्रामवर शेअर केलं. तरुण रतन टाटांच्या या छायाचित्राने लोकांची मने जिंकली. टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना इन्स्टाग्रामवर आठ लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. आणि हो, ही त्यांची १५ वी पोस्ट होती!

८२ वर्षीय रतन टाटा यांनी जे छायाचित्र पोस्ट केलं आहे, त्यात ते अवघे २५ वर्षांचे होते. त्यांचा हा सुंदर आणि आकर्षक फोटो पाहून अनेक लोकांना तर ते हॉलिवूडचे अभिनेते वाटले! हा फोटो लॉस एंजेलिस मधील आहे. रतन टाटा अमेरिकेत शिकत होते. शिक्षण आणि नंतर काही काळ काम केल्यानंतर ते १९६२ मध्ये भारतात परतले.

आपल्या पोस्टमध्ये रतन टाटा लिहितात, ‘हे छायाचित्र मला बुधवारीच शेअर रायचे होते. पण मला कुणीतरी ‘थ्रो बॅक थर्सडे’ बद्दल सांगितले. त्यामुळेच हा लॉस एंजेलिसचा फोटो शेअर करत आहे.’ टाटा यांच्या या फोटोला आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत! तीन हजारांहून अधिक लोकांनी टाटा यांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

थ्रो बॅक थर्सडे म्हणजे काय?

थ्रो बॅक थर्सडे इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रचलित ट्रेंड आहे. या हॅशटॅगसह लोक जुन्या दिवसांतले फोटो शेअर करतात.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here