मुंबई : आज कमॉडिटी बाजारात आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. आज शुक्रवारी सोन्याच्या किमतीत १०० रुपयांची घसरण झाली आहे. चांदी १८५ रुपयांनी स्वस्त झाली आहे.

एमसीएक्सवर सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०३४१ रुपये आहे. त्यात ४५ रुपयांची घसरण झाली. दिवसभरात सोने ५०१०५ रुपयांपर्यंत खाली आले होते. एक किलो ६७९४६ रुपये आहे. चांदीमध्ये ३२१ रुपयांची घसरण झाली आहे.

गेल्या तीन सोने आणि चांदीमध्ये वाढ झाली होती. एमसीएक्सवर सोने आणि चांदीमध्ये तेजी आहे. तीन दिवसात चांदीमध्ये ३४०० रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचा भाव मंगळवारी ५३१ रुपयांनी वधारला. तर बुधवारी त्यात १३० रुपयांची वाढ झाली. सध्या सोने ४२७ रुपयांनी वधारले आहे. तीन दिवसात सोने १००० रुपयांनी वधारले होते.

good returns या वेबसाईटनुसार आज शुक्रवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८७०० रुपये आहे. तर २४ कॅरेट चा भाव ४९७०० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८९५० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५३४०० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४७२०० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५१५०० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९१६० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५१८६० रुपये आहे. जागतिक कमाॅडिटी बाजारात सोन्याचा भाव प्रती औंस १८७९ डाॅलर आहे. चांदीचा भाव प्रती औंस २५.७१ डाॅलर आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here