पाटणा : कंगना रानौत हिच्यावर सोशल मीडियावरून वाचाळ बडबड करण्यासाठी पाटण्यात एक खटला दाखल करण्यात आलाय. राष्ट्रीय लोक समता पक्षानं(RLSP) कंगना रानौत हिच्या ट्विटवर आक्षेप व्यक्त करत थेट न्यायालयात दाद मागितलीय.

अभिनेत्री कंगना रानौत हिनं राष्ट्रीय लोक समता पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांचा अपमान केल्याचा दावा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय. तसंच समाजात घृणा निर्माण करणारी वाचाळ बडबड केल्याची टीका पक्षाकडून कंगना हिच्यावर करण्यात आलीय.

अभिनेत्री कंगनानं ३ डिसेंबर २०२० रोजी ट्विटरवर शेअर करण्यात आलेला एक आक्षेपार्ह फोटो रिट्विट केला होता. या फोटोवर ‘तुकडे तुकडे गँगचे नवीन स्टार्स’ असं लिहिलेलं होतं. हा फोटो उपेंद्र कुशवाहा यांच्या एका राजकीय सभेचा होता. या ट्विटमध्ये उपेंद्र कुशवाहा तसंच इतर नेत्यांवर आझाद काश्मीर, लिबरल, जिहादी, अर्बन नक्षलवादी आणि खलिस्तानी अशी टिप्पणी करण्यात आली होती.

‘या ट्विटच्या माध्यमातून हे लक्षात येतं की कंगना स्वस्तातल्या लोकप्रियतेसाठी सोशल मीडियावर या पद्धतीचे खोटे दावे करते’, अशी थेट टीका पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आणि प्रवक्ते फजल इमाम मल्लिक यांनी केलीय.

कंगनाचं हे ट्विट जवळपास ५००० लोकांनी रिट्विट केल्याचा दावा रालोसपाकडून करण्यात आलाय. या ट्विटच्या माध्यमातून उपेंद्र कुशवाहा यांच्याबद्दल चुकीची धारणा निर्माण करून समाजात घृणा पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असं पक्षाचं म्हणणं आहे.

कंगनाच्या या ट्विटमुळे पक्षाचे लाखो कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. कंगनाचं हे कृत्य पक्षाकडून गंभीरतेनं घेण्यात आलंय. या प्रकरणात कंगना रानौत आणि ‘ट्विट इंडिया’ विरुद्ध पाटण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयालयात खटला दाखल करण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते श्याम बिहारी सिंह यांनी दिलीय.

वाचा :
वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here