नवी दिल्ली : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आपल्यावर मानसीक छळ होत असल्याचा आरोप आमीरने केला होता. पण त्यानंतर आमीरने पुण्याच्या संघाकडून खेळण्याचा निर्णय आता घेतला आहे. याबाबतचे ट्विट पुण्याच्या संघाने केले आहे आणि आपल्या संघात आमीरला संधी दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काही दिवसांमध्ये युएईमध्ये टी-१० लीग स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमध्ये पुणे डेव्हिल्स असा एक संघ आहे आणि या संघाकडून आता आमीर खेळणार आहे. या संघाचे प्रशिक्षकपद दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जाँटी रोड्सकडे देण्यात आलेले आहे.

टी-१० लीग ही आबुधाबी येथे २८ जानेवारीपासून सुरु होणार आहे. या लीगमध्ये पुण्याचा संघाची सहमालकी कृष्णा कुमार चौधरी यांच्याकडे आहे. आमीरला संघात स्थान दिले असल्याची माहिती त्यांनीच दिली आहे. याबाबत चौधरी म्हणाले की, ” जगभरातील स्टार खेळाडूंचा समावेश या लीगमध्ये होत आहे आणि त्यामध्ये आमचा संघ असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या संघाचे प्रशिक्षकपद हे जॉंटी रोड्स यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत. त्याचबरोबर आमच्या संघात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर आणि श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू थिसारा परेरा हे दोन मोठे खेळाडू असणार आहेत. त्यामुळे आमचा संघ चांगलाच समतोल झाला आहे.”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here